शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:32 IST

Eknath Shinde Maharashtra CM Post, Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार या चर्चेने एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशी कुजबूज सुरु होती. अखेर या चर्चांवर शिंदे यांच्या पत्रकार परिषदेने पडदा पडला.

Eknath Shinde Maharashtra CM Post, Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. २३ नोव्हेंबरला त्याचा निकाल आला आणि महायुतीला मोठे बहुमत मिळाले. भाजपाने प्रथमच १३० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही मोठी मुसंडी मारली. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार या चर्चेने एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशी कुजबूज सुरु होती. अखेर या चर्चांवर शिंदे यांच्या पत्रकार परिषदेने पडदा पडला. मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, यापुढचा फ्युचर प्लॅन काय असेल याचे त्यांनी शायरीतून उत्तर दिले.

“मी महायुतीतील घटक आहे. आम्हाला मोठे बहुमत मिळाले आहे. मी कालच महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना फोन करून कळवले आहे की महायुती बळकट करण्यासाठी माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल. आम्ही कायमच महायुतीसोबतच राहू. आमच्या सरकारमध्ये लाडकी बहिण योजना राबवल्याने मी संपूर्ण राज्यातील बहिणींचा लाडका भाऊ झालो. तेच पद माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. माझ्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार बनवण्यात कुठलाही अडथळा येणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शायरीतून सांगितला ‘फ्युचर प्लॅन’

मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याचे सांगताच, एकनाथ शिंदे यांचा पुढचा प्लॅन काय? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले-

जीवन में असली उड़ान अभी बाकी है,अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन,अभी तो सारा आसमान बाकी है…आपण खूप काम केले आहे. आम्ही केलेलं काम तुमच्या समोर आहे. यापुढे महायुती म्हणून काम करायचं आहे. आम्हाला मिळालेले बहुमत जितके मोठे आहे तितकेच आमची जबाबदारीही वाढली आहे. यापुढे महायुती आणखी काम करत राहणार आहोत,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपला ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMahayutiमहायुतीChief Ministerमुख्यमंत्रीShiv Senaशिवसेना