शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

एकनाथ खडसेंना परदेशातून धमकी? पोलिसांकडे तक्रार, आफ्रिकेतून आला फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 4:43 AM

सोमवारी पहाटे आपणास मोबाइलवरून ‘संभालके रहना’ अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार तो कॉल आफ्रिकेतील बुरुंडी या देशातून आल्याचे निष्पन्न झाल्याची

जळगाव : सोमवारी पहाटे आपणास मोबाइलवरून ‘संभालके रहना’ अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार भाजपाचे ज्येष्ठ नेते तथामाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार तो कॉल आफ्रिकेतील बुरुंडी या देशातून आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ‘लोकमत’ला दिली.सोमवारी पहाटे ५.४० वाजता खडसे यांच्या मोबाइलवर ००२५७७१०४३७७१ या क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने ‘संभलके रहना’ इतकेच बोलून फोन कट केला. त्यानंतर खडसे यांचे अंगरक्षक असलेले पोलीस शिपाई गणेश पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार मिस्तरी यांच्या मोबाइलवरही धमकीचा तसाच फोन आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत स्वत: खडसे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.पोलिसांनी दिवसभर केलेल्या चौकशीत हा कॉल आफ्रिकेतील बुरुंडी या देशातून आल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर कक्षामार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याचेही अधीक्षक कराळे यांनी सांगितले. हा कॉल आफ्रिकेतील असल्याचे निष्पन्न होत असले तरी मोबाइल क्रमांक क्लोन करून स्थानिक पातळीवरूनही कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र चौकशीत नेमका प्रकार उघडकीस येईल, असेही कराळे म्हणाले.धमकी का व कोणाकडून आली, याचा अंदाज लावणे कठीण आहे. कदाचित केवळ त्रास देणे किंवा खोडसाळपणाही असू शकतो. मात्र एखाद्याचा खरंच वाईट हेतू असला तर दुर्लक्ष नको म्हणून पोलिसांकडे तक्रार केली आहे.- एकनाथ खडसे, माजी मंत्री

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे