शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?; देवेंद्र फडणवीसांवर 'बाण' सोडून आदित्य ठाकरेंना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 12:10 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुंबईः भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपामध्ये नाराज असलेले खडसे लवकरच महाआघाडीच्या सरकारमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे काल एकनाथ खडसेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊतांनीही खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात असतात, असं विधान केल्यानं खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे देवेंद्र सरकार-2 कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल पक्षाला घरचा आहेर दिला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापल्यानं त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकल्याचंही खडसेंनी सांगितलं होतं. तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. एकनाथ खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असे शरद पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं. भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे खरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी चर्चा तेव्हा रंगली होती. एकनाथ खडसे यांना भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं, तसेच त्यांच्या कन्येला मुक्ताईनगरमधून तिकीट दिल्यानंतरही राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटलांनी तिचा पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येत होत्या.  दरम्यान, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं विचारल्यानंतर त्यांनीही ते वृत्त फेटाळून लावलं होतं. पक्षाच्या आदेशानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गेले 30 वर्षे तुम्ही मला निवडून देताय. मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादी सोबत तीन महिनेच काय तर तीन वर्षांपासून संपर्कात राहिलेलो नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे त्यावेळी दिलं होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत की शिवसेनेत कोणत्या पक्षात जाणार?, या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलं आहे.  

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस