एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 10, 2017 20:24 IST2017-04-10T20:24:57+5:302017-04-10T20:24:57+5:30
भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे

एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अप्पर पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली चौकशी करा असा आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ८ मार्च २०१७ रोजी दिला होता. त्यानुसार एसीबीने सोमवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, (२), १५ आणि भादंवि १०९ प्रमाणे एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, उकाणी आणि इतर अज्ञातांविरुद्ध दाखल केला आहे. गावंडे यांनी ३० मे २०१६ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जालाच फिर्याद समजावी आणि प्रकरणाचा तपास करावा असा आदेश आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जात असून, गुन्हा दाखल होण्याचे काम पहाटे २ वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.