शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी प्रदेशात शैक्षणिक उपक्रम

By admin | Updated: October 9, 2015 02:26 IST

नैसर्गिक प्रकोपाशी झुंजणाऱ्या विदर्भ-मराठवाडा या दोन्ही प्रदेशांनी शिक्षणक्षेत्रात मात्र नवनव्या उपक्रमांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. उपक्रमशील शाळांबाबत शिक्षण विभागाने बुधवारी जाहीर

- अविनाश साबापुरे,  यवतमाळनैसर्गिक प्रकोपाशी झुंजणाऱ्या विदर्भ-मराठवाडा या दोन्ही प्रदेशांनी शिक्षणक्षेत्रात मात्र नवनव्या उपक्रमांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. उपक्रमशील शाळांबाबत शिक्षण विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या विभागांनी अव्वल स्थान पटकाविल्याचे स्पष्ट झाले.‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा’च्या घोडदौडीसाठी नवनवे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शाळांची यादी शासनाने जाहीर केली आहे.संपूर्ण राज्यातून २८६२ उपक्रमशील शाळांची शासनाकडे नोंद झाली आहे. ही आकडेवारी जाहीर करताना शासनाने नांदेड, यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख केला आहे.नांदेड जिल्हा राज्यात पहिल्या स्थानी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा आणि शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली होती. साधारण प्रत्येक केंद्रातून दोन शाळा किंवा जिल्ह्यातून एकंदर २०० शाळांची यादी शासनाकडे पाठवायची होती. परंतु पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आदी जिल्ह्यांतून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. २०० शाळांची यादी पाठवायची असताना या जिल्ह्यांपैकी काहींनी केवळ २४ तर काहींनी ३२ एवढ्याच उपक्रमशील शाळांची नावे शासनाकडे पाठविली आहेत. कोल्हापूरमधून तर केवळ ४ शाळांची नावे पाठविण्यात आली आहेत. शिक्षकांचे राज्यस्तरावर प्रशिक्षणपायाभूत चाचण्या घेऊन कमकुवत विद्यार्थी शोधण्यात आले आहेत. आता त्यांना प्रगत करण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांना विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. विद्या परिषदेतर्फे या उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.