शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर आयुक्तास ठोठावली शिक्षा

By admin | Updated: May 14, 2015 02:20 IST

मुंबईचे माजी प्राप्तिकर आयुक्त अशोक कुमार पुरवार यांना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल दोषी ठरवून येथील सीबीआय विशेष न्यायालयाने

मुंबई : मुंबईचे माजी प्राप्तिकर आयुक्त अशोक कुमार पुरवार यांना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल दोषी ठरवून येथील सीबीआय विशेष न्यायालयाने तीन वर्षांची साधी कैद व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच पुरवार यांनी भ्रष्टाचार करून मिळविलेली अपसंपदा दडविण्यास मदत केल्याबद्दल त्यांच्या पत्नी श्रीमती छाया यांनाही दोन वर्षांची कैद आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.भारतीय महसुली सेवेचे १९७१ च्या तुकडीतील अधिकारी असलेले पुरवार पूर्वी अहमदाबाद येथे प्राप्तिकर उपायुक्त व त्यानंतर मुंबईत प्राप्तिकर आयुक्त होते. सीबीआयने डिसेंबर २००१ मध्ये दाखल केलेल्या खटल्यात विशेष न्यायालयाने पुरवार दाम्पत्यास भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या कलम १३(२) व १३(२) (ई) तसेच भादंवि कलम १०९ अन्वये दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा दिली. पुरवार यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून सुमारे ४०० टक्के जास्त संपत्ती (२.२८ कोटी रु.) भ्रष्ट मार्गांनी कमाविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पुरवार पती-पत्नीची दिल्ली, अहमदाबाद व इंदूर येथे निवासी फ्लॅट, आग्रा येथे भूखंड, २.१७ कोटी रुपयांची किसान विकासपत्रे, २० लाख रुपयांचे शेअर्स व बँकांमधील मुदतठेवी आणि पाच लाख रुपयांची उंची ब्रॅण्डेड घड्याळे अशी मालमत्ता तपासातून उघड झाली होती. या सर्व अपसंपदेविषयी सीबीआयने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आणि पुरावरा दाम्पत्याने दिलेले स्पष्टिकरण अमान्य करून न्यायालयाने त्यांना दोषी धरले. तसेच बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याचाही आदेश दिला.