शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Anil Deshmukh: मुंबई, नागपूरात ईडीचे छापे, तगडा बंदोबस्तही तैनात; पण अनिल देशमुख नेमके आहेत तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 11:42 IST

Anil Deshmukh: ED raids in Mumbai Nagpur crpf security deployed But where exactly is Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे

ठळक मुद्देराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीचा छापासकाळपासून ईडीचे अधिकारी करतायत देशमुख कुटुंबीयांची चौकशीअनिल देशमुख नागपूर, मुंबईतही नाहीत; मग ते नेमके आहेत कुठे?

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे. ईडीचे अधिकारी अनिल देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी दाखल झालेत. त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे आणि कागदपत्र देखी तपासली जात आहे. इतकंच काय तर घराबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) सशस्त्र बंदोबस्त करण्यात आला आहे. पण अनिल देशमुख नेमके आहेत कुठे? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. ED raids in Mumbai Nagpur crpf security deployed But where exactly is Anil Deshmukh

नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीचे अधिकारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दाखल झाले. यावेळी घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले. पण अनिल देशमुख घरात नसल्याची माहिती समोर आली. नागपूरच्या एसीपींनी देखील अनिल देशमुख घरी नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर मुंबईत वरळी येथील अनिल देशमुखांच्या निवासस्थानी देखील ईडीचे अधिकारी सकाळपासून चौकशी करत आहेत. पण मुंबईतही अनिल देशमुख नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच अनिल देशमुख नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान, अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. पण त्यानंतर ते दिल्लीहून परतून पुण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुख सध्या पुण्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूरMumbaiमुंबई