शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
4
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
5
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
6
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
8
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
9
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
10
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
11
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
12
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
13
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
14
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
15
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
16
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
17
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
18
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
19
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
20
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 

शिवसेना खासदार भावना गवळी अडचणीत; ५ संस्थांवर ईडीची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 13:41 IST

वाशिमच्या खासदार भावना गवळींच्या ५ संस्थांवर धाडी; भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर ईडीचे छापे

यवतमाळ: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. यानंतर आज मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.ईडीला संपूर्ण सहकार्य, माध्यमांशी नंतर बोलणार- गवळीया प्रकरणी खासदार भावना गवळींशी संपर्क साधला असताना त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ईडीचे अधिकारी तपास करत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असून त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. त्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण यावर भाष्य करू, असं गवळींनी सांगितलं.

शिवसेना-भाजपमध्ये जुंपलीशिवसेना खासदार भावना गवळी यांच्याकडून संस्थांच्या माध्यमातून लूटमार सुरू आहे. शिवसेना नेत्यांची माफियागिरी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली. त्यांनी गवळी यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचं स्वागत केलं. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सत्ताधारी पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आरोप आधी भाजपकडून केले जायचे. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. मात्र आता भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडूनही तेच सुरू आहे. ईडीच्या नोटिसा अनेकांना जातात. धाडी पडतात. मात्र त्यांचं पुढे काय होतं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय