शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 07:03 IST

संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप...

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कंपनीशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात कंपनीच्या मालकीच्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची ५०.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने कारखान्याशी संबंधित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे असलेली १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे. 

तपासात काय आले समाेर? कमी राखीव किंमत निश्चित करून कन्नड एसएसकेचा लिलाव केल्याचे समोर आले. बारामती ॲग्रो लि.च्या व्यतिरिक्त अन्य दोघांनी लिलावात सहभाग घेतला होता. यात सर्वांत जास्त बोली लावणारा बोलीदार तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरला, तर दुसरा बोलीदार बारामती ॲग्रो लि.च्या जवळचा व्यावसायिक सहकारी होता. ज्यांची आर्थिक क्षमता कमी होती, तसेच साखर कारखान्याचा अनुभव नव्हता.

माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? पण भाजपने लक्षात ठेवावं, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत. - रोहित पवार

काय आहे आरोप? दाखल गुन्ह्यात एमएससी बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी त्यांचे नातेवाईक, खासगी व्यक्तींना योग्य प्रक्रियेचे पालन न करता एसएसके मिलची लिलावात विक्री करून फसविल्याचा आरोप आहे.

‘कन्नड एसएसके’चे बेकायदा संपादन केल्याचा ठपकाबारामती ॲग्रो लि.ने कन्नड एसएसकेचे संपादन बेकायदा केले होते. त्यामुळे कंपनीने मिळवलेली मालमत्ता पीएमएलए कायद्याच्या कलम २(आय)(यू) अन्वये गुन्ह्याची रक्कम असल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले. 

कन्नड एसएसकेची ५०.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या ताब्यात घेण्यात आल्याचे ईडीने सांगितले. या प्रकरणात याआधी तीन वेळा एकूण १२१.४७ कोटींच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याचे आदेश जारी केले गेले आहेत. याबाबत विशेष पीएमएलए न्यायालय, मुंबई यांच्यासमोर कन्नड एसएसकेने चुकीच्या पद्धतीने संपादन केल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांची न्यायालयाने आधीच दखल घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने सांगितले. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखाने