शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ईडीकडून अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची शक्यता, अजामीनपात्र वाॅरंट काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 12:28 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला गैरहजर राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्याविरूद्ध लवकरच अजामीनपात्र वाॅरंट काढले केले जाणार आहे. त्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी छापे टाकून खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.  देशमुख यांनी ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी रविवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याबाबत अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे मत बनले आहे. त्यानुसार त्याबाबत तांत्रिक व न्यायालयीन बाबींची पूर्तता केली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. देशमुख यांनी सोमवारी ईडीला पत्र पाठवून आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे.ऋषिकेशचीही चौकशीकडे पाठदेशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र, त्यांनीही त्याकडे पाठ फिरवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये स्वतःसह कुटुंबातील सदस्यांनाही ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मागितले आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख हे चौकशीसाठी गैरहजर राहिले असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण