शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय भूकंप? शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'सत्ता पे चर्चा', राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 18:08 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 10 दिवसांपूर्वी मला भेटले असा गौप्यस्फोट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान

रायगड: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 10 दिवसांपूर्वी मला भेटले असा गौप्यस्फोट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.काय चर्चा झाली दोघांमध्ये -10 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे भेटले. तुमची राजकीय भूमिका काय? असं त्यांनी विचारले, त्यावर मी, ‘तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा, आम्ही आमची भूमिका जाहीर करतो’ असं त्यांना म्हणालो. सरकारमध्ये राहण्याची उद्धव यांची मानसिकता राहिलेली नाही, असे मला वाटते असं अत्यंत सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.उद्धव यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. भाजपला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यता पवार यांनी व्यक्त केली. चिंतन शिबीराप्रसंगी येथे पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी ही माहिती दिली.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि भाजपाच्या कट्टर विरोधक ममता बॅनर्जी यांची मुंबईत भेट घेतली होती. दुसरीकडे काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. राणेंना सत्तेत सहभागी करून शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सामनातून भाजपाविरोधात जोरदार टीका सुरु आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला मोठं राजकीय महत्व आलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार