लवकर सुरू व्हावं रुटीन, कामं वाट पाहताहेत... अशी होती कविता महाजन यांची अखेरची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 20:52 IST2018-09-27T20:48:54+5:302018-09-27T20:52:03+5:30
आजारपण असतानाही त्यांची काम करण्याची धडपड सुरु होती, असा त्यांच्या अखेरच्या पोस्टमधून उलगडा होतो.

लवकर सुरू व्हावं रुटीन, कामं वाट पाहताहेत... अशी होती कविता महाजन यांची अखेरची पोस्ट
मुंबई : लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. पण त्यांनी टाकलेली आपली शेवटची पोस्ट ही फारच भावनिक होती. आजारपण असतानाही त्यांची काम करण्याची धडपड सुरु होती, असा त्यांच्या अखेरच्या पोस्टमधून उलगडा होतो.
प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन https://t.co/i18dcDjnni
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 27, 2018
ही पाहा कविता महाजन यांची अखेरची पोस्ट
कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या कन्या होत्या. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता.