शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आधी सचिन-विराटची सेंच्युरी बघितली, आता पेट्रोल-डिझेलचे शतक बघतोय, उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 9:33 PM

पेट्रोल-डिझेलच्या दरांत वेगाने वाढ होत आहे. फब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 4.87 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.99 रुपयांनी वाढले. या महिन्यात कंपन्यांनी आतापर्यंत तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. (Petrol-Diesel Prices)

ठळक मुद्देदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.विरोधी पक्षांतील नेते ट्विटरपासून ते रस्त्यापर्यंत या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत आहेत. एका महिन्यात जवळपास पाच रुयांनी महागलं पेट्रोल

मुंबई - देशभरात पेट्रोल-डिझेल (petrol and diesel) दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांतील नेते ट्विटरपासून ते रस्त्यापर्यंत या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या शतकाचा उल्लेख केला. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. (CM Uddhav Thackeray said saw the century of virat sachin now seeing the century of petrol and diesel)

ठाकरे म्हणाले, ''पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली. मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत.'' सध्या प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी नव्हे एवढ्या वाढल्या आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगर नंतर बिकानेरमध्येही पेट्रोल 100 रुपयांच्याही पार गेले आहे. पेट्रोल 100.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.09 रुपये प्रति लिटरवर गेले आहे.

Pooja Chavan Suicide Case:...अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

एका महिन्यात जवळपास पाच रुयांनी महागलं पेट्रोल -पेट्रोल-डिझेलच्या दरांत वेगाने वाढ होत आहे. फब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 4.87 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.99 रुपयांनी वाढले. या महिन्यात कंपन्यांनी आतापर्यंत तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. दिल्लीत पेट्रोल 91.17 आणि डिझेल 81.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. यापूर्वी डिझेलचा दर 30 जुलै 2020 रोजी 81.94 रुपयांवर गेला होता. तर, मुंबईत पेट्रोलच्या किंती 97.57 रुपयांवक तर डिझेल 88.60 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा...!; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं असं उत्तर

Pooja Chavan Suicide Case: शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप

संजय राठोडांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले, उद्धव ठाकरेपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात रान उठवले होते, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, सरकार चालवताना न्यायाने वागावं ही आमची जबाबदारी आहे. तपास झालाच पाहिजे, परंतु गेल्या काही दिवसांत गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे, चौकशीत दोषी असेल तर कोणी कितीही मोठा असेल तर शिक्षा होणारच आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल असा न्याय नको, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकार