e-KYC अनिवार्य, LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; कशी करावी प्रोसेस? प्रक्रिया केली नाही तर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:30 IST2026-03-16T13:28:06+5:302026-03-16T13:30:46+5:30

LPG e-KYC Process News: e-KYC प्रक्रिया सोप्या पद्धतीने करता येऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

e kyc mandatory important update for lpg domestic customers know how to process and if not done then | e-KYC अनिवार्य, LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; कशी करावी प्रोसेस? प्रक्रिया केली नाही तर…

e-KYC अनिवार्य, LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; कशी करावी प्रोसेस? प्रक्रिया केली नाही तर…

LPG e-KYC Process News: मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून केंद्र सरकारने 'पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस' (पीएनजी) कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना अनुदानित एलपीजी सिलिंडर ठेवण्यास किंवा नव्याने खरेदी करण्यास बंदी घातली आहे. गॅस पुरवठ्यावर आलेला ताण कमी करण्यासाठी पीएनजीच्या विस्ताराला गती देण्याचे निर्देश नियामक संस्थांना केंद्र सरकारने दिले आहेत. यातच आता पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. घरबसल्या याची प्रक्रिया कशी करावी, ते जाणून घेऊया...

घरगुती LPG ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आले असून, पेट्रोलियम मंत्रालयाने बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे हे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया Indane, Bharat Gas किंवा HP Gas च्या मोबाइल ॲपद्वारे मोफत आणि घरबसल्या करता येऊ शकते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. सबसिडी मिळवण्यासाठी आणि गॅस सिलिंडर मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हे करणे आवश्यक आहे. यामुळे सबसिडी सुरू राहण्यास मदत होईल आणि गॅस पुरवठ्यातील अडचणी दूर होतील.

LPG e-KYC प्रक्रिया केली नाही तर...

LPG ग्राहकांनी e-KYC पूर्ण केले नाही, तर गॅस बुकिंग प्रक्रिया केली जाणार नाही. कंपनी डिलिव्हरी रद्द करू शकते. सबसिडी ट्रान्सफर करण्यातही अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत सिलेंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागू शकते. ज्यामुळे ₹३०० ते ₹४०० पर्यंत सबसिडीचा फायदा घेता येऊ शकणार नाही.  e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात यश आले नाही, तर तुमचे कनेक्शन ब्लॉक किंवा निलंबित केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. गॅस सबसिडी विनाव्यत्यय सुरू राहण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, असे सांगितले जात आहे.

LPG e-KYC प्रक्रिया नेमकी कशी करावी? पाहा, सोप्या स्टेप्स...

- ॲप डाउनलोड करा: तुम्ही ज्या गॅस कंपनीचे ग्राहक असाल, त्या कंपनीचे मोबाइल ॲप किंवा UMANG ॲप डाउनलोड करा.

- लॉगिन करा: मोबाइल नंबरद्वारे ॲपमध्ये लॉगिन करावे.

- आधार प्रमाणीकरण: e-KYC किंवा 'आधार प्रमाणीकरण' पर्यायावर क्लिक करा.

- Face Authentication: Aadhaar FaceRD ॲप वापरून तुमचा चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.

- पर्यायी पद्धत: तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊनही केवायसी फॉर्म भरू शकता.

 

Web Title: e kyc mandatory important update for lpg domestic customers know how to process and if not done then