शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

मोबाईल अ‍ॅपव्दारे ई पीक पाहणी अहवाल : राज्य सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 14:04 IST

पुणे जिल्ह्यातील बारामतीसह राज्यातील सहा तालुक्यातील पिकांचे नमुने या अ‍ॅपवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतक-यांनी नोंदविलेल्या माहितीची तपासणी तलाठी करणार

- राहूल शिंदे - पुणे: शेतक-यांकडून घेतल्या जाणा-या पिकांची अचूक स्थिती सध्या वापरल्या जाणा-या पध्दतीमुळे कृषी व महसूल विभागाकडे प्राप्त होत नाही. त्यामुळे कोणत्या पिकांची किती पेरणी झाली किती उत्पादन होईल, कोणत्या भागातील पिकांचे दुष्काळ,गारपीट व अ‍वकाळी पावसामुळे नुकसान झाले,याबाबतची माहिती शासनाला उपलब्ध होत नाही. परंतु,राज्य शासनाने मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-पिक पाहणी अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला असून पुणे जिल्ह्यातील बारामतीसह राज्यातील सहा तालुक्यातील पिकांचे नमुने या अ‍ॅपवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शेतक-यांनी पेरलेल्या पिकांची आणि पिकांच्या स्थितीची नोंद तलाठी कार्यालयात ठेवली जाते.एका तलाठ्याकडे ८ ते १० हजार गट असतात.त्यामुळे एका तलाठ्याला सर्व ठिकाणी जावून पिकांची नोंद करणे शक्य होत नाही.परिणामी शासनाकडे पिक परिस्थितीची खरी माहिती उपलब्ध होत नाही.परिणामी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी खरी माहिती प्राप्त होत नाही.त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीने मोबाईल अ‍ॅपद्वारे ई पीक पाहणी केली जाणार आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून फोटो संबंधित पिकाचे छायाचित्र मोबाईल अ‍ॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. स्वत: शेतकरी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर पिकांच्या नोंदी करू शकेल.राज्य शासनाला टाटा ट्रस्टतर्फे हे मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले जात आहे. तलाठी कार्यालयाकडून शेतक-यांना नोंदणी बाबत मार्गदर्शन केले जाईल. शेतक-यांनी नोंदविलेल्या माहितीची तपासणी तलाठी करतील. त्यानंतर संबंधित माहिती शासनाला समबिट करतील. परिणामी शासनाला खरी आणि अचूक माहिती प्राप्त होईल. त्यामुळे कोणत्या पिकांची पेरणी किती क्षेत्रावर झाली आहे.त्यातून किती उत्पादन मिळू शकेल. त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या संदर्भातील नियोजनपूर्व निर्णय घेणे शासनाला शक्य होईल.सध्य स्थितीत पिक पेरणीच्या नोंदी लेखी स्वरुपात केल्या जातात.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिक पेरणी नोंदीचा दाखला आवश्यक असतो. मात्र, तलाठी कार्यालयाकडून एकाच सातबारा उता-यावर विविध पिकांच्या नोंदी केल्या जातात.परंतु,आॅनलाईन नोंदणीमुळे पिक पेरणी दाखल्यात बदल करता येणार नाही.त्याचप्रमाणे कृषी विभागातर्फे विविध पिकांचे कोड निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होणार आहे.त्याचा फायदा या अ‍ॅपमध्ये पिकांची नोंदणी करण्यासाठी होईल,असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले................टाटा ट्रस्ट तर्फे ई पिक पेरणीसाठीचे अ‍ॅप तयार करून दिले जात असून सध्या ते टेस्टींग फेजह्णमध्ये आहे. राज्यातील सहा विभागातील सहा तालुक्यांची पिक पेरणीची माहिती प्रायोगिक तत्त्वावर भरून घेतली जात आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघरमधील वाडा,औरंगाबादमधील फुलंबरी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि नागपूर जिल्ह्यातील कामाठी या सहा तालुक्यांचा यात समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीonlineऑनलाइनdigitalडिजिटलMobileमोबाइल