शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या काळात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार? आशीष शेलारांच्या ट्विटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 08:55 IST

Ashish Shelar : दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे. 

अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात असून, महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार, असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे. 

या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. विदेशी दारुवरील कर माफ  करण्यात आला होता. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत देण्यात आली होती. वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी देण्यात आली होती.

आता दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? म्हणूनच श्री.अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले होते? दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात? अशा प्रश्नांची सरबत्ती आशीष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.

दरम्यान, मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.तेव्हा त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे