नाचता नाचता गोविंदाचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; दहिहंडी कार्यक्रमात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 20:45 IST2022-08-19T20:44:37+5:302022-08-19T20:45:14+5:30

पाजपंढरी गावातील होमाआळी मंडळीतले कार्यकर्ते होते, वसंत लाया चोगले यांचे आकस्मित हृदयविकाराच्या झटक्याने सर्वत्र शोककळा पसरली. 

During Dance Govinda dies of heart attack; Mourning in the Dahihandi program in Dapoli | नाचता नाचता गोविंदाचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; दहिहंडी कार्यक्रमात शोककळा

नाचता नाचता गोविंदाचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; दहिहंडी कार्यक्रमात शोककळा

दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील पाज पंढरी गावातील वसंत लाया चौगले या गोविंदाचा नाचताना हृदयविकाराने मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह गेला पोहोचला होता यामध्ये चौगुले सहभागी झाले होते परंतु नाचत असतेवेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली, अधिक उपचारासाठी हलविण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

पाजपंढरी गावातील होमाआळी मंडळीतले कार्यकर्ते होते, वसंत लाया चोगले यांचे आकस्मित हृदयविकाराच्या झटक्याने सर्वत्र शोककळा पसरली. गोविंदामध्ये नाचताना आकस्मित निधन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात पंचक्रोशीतील गोविंदावर दुःखाचे सावट पसरले

Web Title: During Dance Govinda dies of heart attack; Mourning in the Dahihandi program in Dapoli