शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ टायरपासून बांधला टिकाऊ बंधारा--गूड न्यूज

By admin | Updated: June 4, 2015 00:02 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम : वसंतगडमध्ये ११० टायरपासून बांधला बंधारा, ५० विद्यार्थ्यांचा सहभाग

दीपक पवार - तांबवे  --वसंतगड, ता. कऱ्हाड येथे गडाच्या पायथ्याशी कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ टायरपासून चक्क बंधारा बांधला आहे.वसंतगड, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५० विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सहभाग घेतला होता. या सात दिवसांच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गाड्यांचे टायर गोळा केले. ११० टायरपासून बंधारा उभा करून नवीन उपक्रम राबविला. बंधाऱ्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. एक बंधारा बांधण्यासाठी दोन ते चार लाख रूपये खर्च होतो. परंतू हा टायर पासून बांधलेला बंधारा या खर्चाच्या २० टक्के कमी खर्चात व टिकाऊ स्वरूपाचा होत आहे, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. टायरपासून बनविलेला हा बंधारा कुतुहलाचा विषय झाला आहे. प्रथमत: मुलांनी बंधाऱ्याची जागा निवडली. त्यानंतर गावातून व इतर ठिकाणाहून त्यांनी ११० टाकाऊ टायर जमा केले. सोबत ३७ पोती सिमेंट, १.५ ब्रास वाळू, २.२५ ब्रास खडी, ८ एम. एम. जाडीची १०० कि. ग्रॅम सळई हे साहित्य विद्यार्थ्यांनी वसंतगडच्या ग्रामस्थांकडून जमा करून घेतले. या टायर बंधाऱ्यास साधारणता: ४० ते ४५ हजार रूपये खर्च आला आहे. विद्यार्थ्यांनी सात दिवस श्रमदान करून हा बंधारा उभा केला आहे. बंधाऱ्यासाठी सेवायोजनेचे प्रमुख प्रा. उमेश देशपांडे, प्रा. उमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. पी. एम. खोडके, प्रा. डॉ. पी. एम. जोशी, प्रा. डॉ. एम. एस. हेडापू, प्रशासकीय अधिकारी एस. एन. पाटील यांचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्यावतीने रघुनाथ नलवडे, अ‍ॅड. अमित नलवडे यांचेही सहकार्य मिळाले. ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटणार...पावसाळ्यात वसंतगड डोंगरावरून मोठ्या प्रमाणावरून पाणी वाहून येते. हे पाणी अडविण्यात येत नसल्याने पूर्वी वाया जात होते. मात्र, विद्यार्थ्यांनी डोंगराच्या पायथ्यालाच बंधारा बांधल्याने यावर्षीपासून डोंगरावरून वाहून येणारे पाणी या बंधाऱ्यात साचून राहणार आहे. त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार असून येथील पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे.