शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात...; उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली, राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 20:01 IST

Narayan Rane : भाजप नेते तथा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत, त्यांच्या पापामुळे ही कंपनी राज्याबाहेर गेली, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.

हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोची रोजगार निर्मिती क्षमता असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यासाठी, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, आता भाजप नेते तथा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत, त्यांच्या पापामुळे ही कंपनी राज्याबाहेर गेली, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी दुसरीकडे गेली - वेदांता फॉक्सकॉनवरून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवताना नारायण राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंना काही काम नाही. एक तर घर सोडत नाहीत. अडीच वर्षही मातोश्रीतच होते, आजही मातोश्रीतच आहेत. फक्त बोलायचे आहे. बाकी ते स्वतः काही करू शकले नाही आणि त्यांनी केलेल्या पापामुळे ही कंपनी दुसरीकडे गेली," असे राणे यांनी म्हटले आहे.

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात -यावेळी, शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या जात असलेल्या गद्दार शब्दावरुनही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राणे म्हणाले, "गद्दार कुणाला म्हणावं, मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेने एकत्र लढले, मेजॉरीटीत आले. यानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाचा त्याग केला आणि गद्दारी करूनच ते मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले. फक्त पदासाठी. त्यांनी ही गद्दारी केली आहे. यामुळे गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे." 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलMaharashtraमहाराष्ट्र