मुरु डमध्ये कारपेट मशीन बंद पडल्याने खोळंबा

By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30

सबनीस आळी येथे कारपेट करण्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या एका अवघड वळणावर कारपेट मशीन बंद पडल्याने येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली

Due to shutdown of the carpet machine in Muru Dule | मुरु डमध्ये कारपेट मशीन बंद पडल्याने खोळंबा

मुरु डमध्ये कारपेट मशीन बंद पडल्याने खोळंबा


मुरुड /नांदगाव : शहरात डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. सबनीस आळी येथे कारपेट करण्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या एका अवघड वळणावर कारपेट मशीन बंद पडल्याने येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. गेल्या सहा दिवसांपासून ही कारपेट मशीन बंद पडल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले. लवकर ही मशीन येथून हलवावी, अशी मागणी करत आहेत.
अडलेला हा रस्ता समशानभूमीकडे जाणारा आहे. त्यामुळे अंत्ययात्रेच्या वेळी मोठी कसरत करून स्मशानभूमीकडे जावे लागते. याच परिसरात बाबा दांडेकर व नितीन पवार हे दोन नगरसेवक राहात आहेत. त्यांना सुध्दा या कारपेट मशीनचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी सुध्दा ही मशिनरी येथून हलवावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे विचारणा केली असता मशिनरीमध्ये बिघाड झाला असून लवकरच दुरु स्ती करून ती इतर ठिकाणी पाठवली जाईल असे सांगण्यात आले.

Web Title: Due to shutdown of the carpet machine in Muru Dule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.