Due to Nisarga Cyclone likely to hit Mumbai, changes train schedules rkp | Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला असून दुपारी अलिबाग किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत आहे. या निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला असून दुपारी अलिबाग किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 

मुंबईहून सुटणाऱ्या रेल्ले गाड्यांची बदललेली वेळ 
 • एलटीटी-गोरखपूर विशेष ट्रेन सकाळी 11. 10 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार. 
• एलटीटी-थिरुअनंतरपुरम विशेष ट्रेन सकाळी 11.140 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता सुटणार. 
• एलटीटी-दरभंगा विशेष ट्रेन दुपारी 12.15 ऐवजी रात्री 8.30 वाजता सुटणार. 
• एलटीटी-वाराणसी विशेष ट्रेन दुपारी 12.40 ऐवजी रात्री 9 वाजता सुटणार. 
• सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष ट्रेन दुपारी 3 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार.

या रेल्वे उशिराने मुंबईत पोहोचणार 
• सकाळी 11.30 वाजता मुंबईला पोहोचणारी पाटणा-एलटीटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल. 
• दुपारी 2.15 वाजता मुंबईला पोहोचणारी वाराणसी-सीएसएमटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होईल.
• दुपारी 4.40 वाजता पोहोचणारी थिरुअनंतपुरम-एलटीटी स्पेशल ट्रेन पुण्याला वळवून एलटीटीला नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल.

याचबरोबर, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. लोकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ट्रॅफिक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. आज दुपारी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Due to Nisarga Cyclone likely to hit Mumbai, changes train schedules rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.