लॉकडाऊनची भीतीने मजुरांनी धरली घरची वाट; गावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:33 IST2021-04-03T16:31:15+5:302021-04-03T16:33:39+5:30

lockdown possibility in maharashtra: अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या गावची वाट धरली असून, घरी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.

due to lockdown possibility in maharashtra workers move to own villages | लॉकडाऊनची भीतीने मजुरांनी धरली घरची वाट; गावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ

लॉकडाऊनची भीतीने मजुरांनी धरली घरची वाट; गावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ

ठळक मुद्देगावी परतणाऱ्यांच्या संख्येत वाढलॉकडाऊनच्या भीतीमुळे मजुरांनी धरली घरची वाटमुंबईतील विविध टर्मिनसवर गावी जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई : लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील.  वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी फेसबुक लाइव्हदरम्यान दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या गावची वाट धरली असून, घरी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. (lockdown possibility workers move to village)

दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच यापूर्वीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगार पुन्हा घरची वाट धरू लागले आहेत. 

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या २० रेल्वेसेवा चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा या ठिकाणी जातात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ शुक्रवारी नोंदवली गेली. नवीन २४ हजार १२६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून, एकूण २४,५७,४९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण ०३,८९,८३२ सक्रीय रुग्ण असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

दरम्यान, जनतेला संबोधित केल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: due to lockdown possibility in maharashtra workers move to own villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.