शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:15 IST

मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे. 

ठाणे, दि. 29 - मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणनं वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत. तेथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. या परिस्थित नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार तसंच गरजेनुसार आपल्या नजिकच्या कार्यालयाशी / संबंधित अधिका-यांशी  अथवा १८००-२३३-३४३५ किंवा  १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

१)    ठाणे १ विभाग -    गडकरी उपविभाग - ३ फिडर बंद – सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित-    कोपरी उपविभाग – १ फिडर बंद -  सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित -    किसान नगर उपविभाग – डी.टी.सी. बंद – सुमारे ३ हजार ग्राहक प्रभावित २)    वागळे विभाग – २५ फिडर  – सुमारे १,२५ ,००० हजार ग्राहक प्रभावित ३)    ठाणे २ विभाग -    कळवा उपविभाग – ४ फिडर बंद – सुमारे ४५ हजार ग्राहक -    विकास उपविभाग – ४ फिडर – सुमारे १० हजार ग्राहक -    पावरहाउस – माहिती लवकरच उपलब्ध होईल ४)    ठाणे ३ विभाग  - सुमारे ११०००० हजार ग्राहक५)    भांडुप विभाग – १ सब स्टेशन व ४ फिडर - सुमारे १६००० हजार ग्राहक६)    मुलुंड विभाग – ५ सब स्टेशन - सुमारे ७६००० हजार ग्राहक ७)    वाशी विभाग -    एरोली उपविभाग - ४ फिडर – २० हजार ग्राहक -    कोपर खैरणे उपविभाग – १ ट्रान्सफॉर्मर – १ हजार ग्राहक -    वाशी उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक ८)    नेरूळ विभाग – प्रभावित नाही ९)    पनवेल विभाग -    पनवेल १ (भिंगरी) उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक -    उरण उपविभाग – १ उपविभाग – १००० ग्राहक

 

पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'

दरम्यान, मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही  रेल्वे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे.  कधीही न थांबणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुंबईतल्या तुफान पावसामुळे बंद करण्यात आला आहे. एक्स्प्रेस वेवरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करणार आहेत. महामार्ग पोलिसांकडून मुंबईला जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे.  पावसाने उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मुंबई एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. सी लिंकवरही टोल घेतला जाणार नाही असे ट्विटट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

मुंबईवरुन आलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेचा द्रुतगती मार्ग 6:30 पासून बंद केला. तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व लोकल मार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे चहूबाजूंनी मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुंबई- पुणे महामार्गही रोखण्यात आला आहे. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कुसगाव, उर्से टोलनाक्याजवळ रोखली जुना हायवे NH 4 ही बंद करण्यात आला आहे.  नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबवली आहे.  वी मुंबईतील सायन झ्र पनवेल हायवे, ठाणे झ्र बेलापूर हायवे, शिळफाटा मार्ग या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी आहे.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार