दुष्काळ मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळले
By Admin | Updated: March 11, 2016 04:05 IST2016-03-11T04:05:56+5:302016-03-11T04:05:56+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १०० कोटी रुपयांच्या मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळण्यात आल्याची कबुली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

दुष्काळ मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळले
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १०० कोटी रुपयांच्या मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळण्यात आल्याची कबुली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
डॉ. मिलिंद माने, प्रतापराव चिखलीकर आदी सदस्यांच्या विचारलेल्या लेखी प्रश्नात खडसे यांनी स्पष्ट केले की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कापणीच्या नोंदी पूर्ण नसल्याने तूर्त वगळण्यात आले आहे.
२०१५च्या खरिप हंगामात १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे. ३ नोव्हेंबर २०१५च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ जाहीर करण्याचे निकष घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार, दुष्काळ जाहीर करण्यास पात्र नसलेल्या परंतु पीक नुकसान झालेल्या अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक विभागातील कापूस, नागपूर अमरावती विभागातील सोयाबिन आणि नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २ मार्च २०१६च्या निर्णयाद्वारे विशेष मदत जाहीर केलेली आहे, असे खडसे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)