शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 18:28 IST

भिमाशंकरमध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात..

ठळक मुद्देभाविकांनी दर्शनासाठी येणे टाळावे व गर्दी करू नये असे आवाहन

भिमाशंकर  : कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक मह्त्वाच्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचपार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील व बारा ज्योर्तिलिंगापैकी एक म्हणून ख्याती असलेले श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर आज (दि.१७ ) पासून दुपारी तीनची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगत याची तीव्रता कमी होईपर्यंत हा निर्णय लागू राहील असे त्यांनी जाहीर केले. तसेच या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन भिमाशंकर देवस्थानने भाविकांना केले आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे , मुंबई, पंढरपूर , जेजुरी यांसारख्या मह्त्वाच्या देवस्थानांना मंदिर बंद ठेवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्यातील भिमाशंकर येथील ज्योर्तिलिंगाचे मंदिर बंद ठेवण्याविषयी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात बैठक झाली. यावेळी विश्वस्त पुरूषोत्तम गवांदे, दत्तात्रय कौदरे, प्रसाद गवांदे, आशिष कोडिलकर, संतोष गवांदे, जालिंदर कौदरे, दत्तु हिले, विश्वनाथ गायकवाड, देवस्थानचे व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे तसेच भिमाशंकर ग्रामस्थ उपस्थित होते.सुरेश कौदरे म्हणाले, भिमाशंकरमध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. यामध्ये एखादा भाविक कोरोना बाधित असेल तर यातून भाविक तसेच मंदिरात काम करणारे कर्मचारी,ग्रामस्थांना संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे शासनाकडून सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  त्यानुसार भीमाशंकर मंदिर बंद करण्यात येत असून भाविकांनी दर्शनासाठी येणे टाळावे व गर्दी करू नये असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी केले आहे.तसेच मंदिरात काम करणाऱ्या कर्मचारी व पुजाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत, सॅनिटायझरच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून सुरक्षा रक्षक प्रत्येक भाविकाला सॅनिटायझर लावून मंदिरात सोडत होते. मंदिर परिसरात जनजागृती करण्यासाठी फलक देवस्थानच्या वतीने लावण्यात आले असल्याचे व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे यांनी सांगितले.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरambegaonआंबेगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर