शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CIA च्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा खरा चेहरा समोर आला - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 6:59 PM

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने वेळोवेळी हे सांगितले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त सांस्कृतीक संघटना राहिली नसून ती एक राजकीय संघटना झाली आहे. केंद्र आणि विविध राज्यातील भाजप सरकारमध्ये संघाचे लोक महत्त्वाच्या हुद्द्यावर बसले आहेत. विविध संस्थावर संघाचे लोक नेमले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राजकीय संघटना आहे. केंद्र आणि विविध राज्यात या संघटनेच्या विचारांचे आणि त्यांच्या इशा-यावर चालणारे सरकार आहे. म्हणूनच संघ आणि संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांच्या कारवाया भाजप सरकारच्या काळात वाढल्या आहेत.

सीआयए ही गुप्तचर संघटना असल्यामुळे या संघटनाबाबत त्यांच्याकडे नक्कीच काही गुप्त अहवाल, पुरावे असतील. ते मागवून घ्यावेत आणि त्याची पडताळणी करून या संघटनांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. पण विद्यमान सरकारमध्ये या संघटनांच्या विचारांचे लोक असल्याने ते या संघटनांच्या विघातक कारवायांवर पांघरून घालत आहेत, किंबहुना या संघटनांना सरकारचा पाठिंबा असल्याने त्यांच्या गुप्त कारवायांना आळा घालण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. CIA चा अहवाल पुराव्यानिशी देशातील जनतेसमोर आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे असे  चव्हाण म्हणाले.

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण