मोठी बातमी: Mumbai Drug Case: ड्रग्स पेडलर जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 10:03 IST2021-11-01T09:23:35+5:302021-11-01T10:03:12+5:30

Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या Nawab Malik यांनी आज थेट विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Drug peddler Jaideep Rana's relationship with Devendra Fadnavis, serious allegations of Nawab Malik | मोठी बातमी: Mumbai Drug Case: ड्रग्स पेडलर जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप 

मोठी बातमी: Mumbai Drug Case: ड्रग्स पेडलर जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप 

मुंबई - मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे. मलिक यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. 

 

मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. 

 

दरम्यान, या सगळ्या खेळामध्ये  प्रतीक गाभा हा मुख्य खेळाडू असून, त्याच्याबाबत उलगडा लवकरच करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा वाझे असून, त्याचा उद्धव ठाकरेंशी संबंध नाही. मात्र युती सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर नीरज गुंडे फडणवीस यांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे जात होता, असा दावा मलिक यांनी केला. 

Read in English

Web Title: Drug peddler Jaideep Rana's relationship with Devendra Fadnavis, serious allegations of Nawab Malik