ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, मंत्र्यासह अभिनेत्यांना फोडला घाम; जिल्हावासियांना समीर वानखेडेंचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:05 PM2021-10-25T23:05:59+5:302021-10-25T23:06:22+5:30

समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात.

Drug mafia's hard time, actors and ministers broke out in sweat; Sameer Wankhede's pride to the people of the district | ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, मंत्र्यासह अभिनेत्यांना फोडला घाम; जिल्हावासियांना समीर वानखेडेंचा अभिमान

ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, मंत्र्यासह अभिनेत्यांना फोडला घाम; जिल्हावासियांना समीर वानखेडेंचा अभिमान

Next

वाशिम - ड्रग्स माफियांवर धडाकेबाज कारवाई करून मंत्र्यांसह अभिनेत्यांना घाम फोडणारे एनसीबीचे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो/अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष) विभागीय संचालक समीर वानखेडे हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरूड तोफा या गावचे मूळ रहिवासी असून, ही बाब जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. (People of the Washim district pride to Sameer Wankhede.)

समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात. त्यांचे वडील मुंबई येथे पोलीस विभागात अधिकारी म्हणून नोकरीवर असताना, ते मुंबईतच स्थाईक झाले. समीर यांचे संपूर्ण शिक्षण तेथेच झाले असून, ते आयआरएसच्या २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत.  समीर वानखेडे हे ड्रग्सशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली. 

सुशांतसिंगपासून तर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानच्या मुलापर्यंत त्यांनी कारवाया केल्या आहेत. ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ आणि मंत्री नबाब मलिक यांनाही घाम फोडणारे समीर वानखेडे मूळ वाशिमकर असल्याचे समजताच जिल्हावासियांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

विविध पदांवर बजावले कर्तव्य - 
२००८ ते २०२१ पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिटचे (एआययू) उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक, अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

गावाशी ऋणानुबंध कायम! -
समीर वानखेडे यांचे बालपण मुंबईत गेले असले तरी गावाशी असलेला ऋणानुबंध त्यांनी कायम ठेवला आहे. नोकरीत असतानाही ते दीड, दोन वर्षातून एकदा आपल्या गावी वरूड तोफा येथे आवर्जून येतात. याशिवाय कुटुंब तसेच भावकितील महत्वाच्या कार्यातही ते हजेरी लावतात.

Web Title: Drug mafia's hard time, actors and ministers broke out in sweat; Sameer Wankhede's pride to the people of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app