शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ, मराठवाडा मात्र अद्याप कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:38 AM

औरंगाबाद, अमरावती विभागात ठणठणाट

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागात पाण्याचा ठणठणाट असून, विदर्भातील नागपूर विभागातदेखील पाणीबाणीची स्थिती आहे. अमरावतीमध्ये अवघा १८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही.मान्सूनचा दोन महिन्यांचा काळ लोटला, तरी मराठवाडा आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा नाही. राज्याच्या दुसऱ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांतच मान्सूनची सरासरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वांत मोठे असलेले उजनी धरण (११७.४७ टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली.

टॅग्स :water shortageपाणीकपात