शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांत चार वेळा दुष्काळ!, निम्मे राज्य कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:24 IST

मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते.

- विशाल शिर्केपुणे : मागील आठ वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याच्या आकडेवारीवरून चार वर्षे दुष्काळाची असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मा महाराष्ट्र कायमच दुष्काळाच्या छायेत असल्याचे आकडेवारी सांगते. त्यातही मराठवाड्याकडे पाऊस सातत्याने पाठ फिरवत असून कोकण, पुणे आणि नाशिकचा भाग वगळता उर्वरीत राज्यात पाणीसाठा जेमतेमच असल्याचे चित्र आहे.जून ते सप्टेंबर या काळात राज्यात मान्सूनचा पाऊस पडतो. आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडतो. क्वचित नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस होतो. सप्टेंबरअखेरीस पडलेल्या पावसाच्या आधारे वर्षभराचे पिण्याचे, शेती आणि उद्योगाच्या पाण्याचे नियोजन केले जाते. राज्यात जून ते ३१ आॅक्टोबर अखेरीस सरासरी १ हजार १९८ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत या वर्षी अवघ्या ८८१.७ (७३.६%) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये आॅगस्टच्या मध्यानंतर पाऊसच झालेला नाही, तर काही तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिना पूर्ण कोरडा गेला.गेल्या आठ वर्षांचे नोव्हेंबर महिन्यातील धरण साठ्याचे चित्र पाहिल्यास कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच जेमतेम साठा दिसत आहे. मराठवाडा, नागपूर आणि अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात एकूण क्षमतेच्या ६० ते ७० टक्केच पाणीसाठा दिसून येत आहे. मराठवाड्यात २०११ मध्ये सर्वाधिक ८८ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर चार वर्षे दुष्काळाची आणि दोन वर्षे जेमतेम पाण्याची गेली.नागपूर विभागात आठ पैकी ३ वर्षे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा होता. तर चार वर्षे ५८ ते ६५ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात ४० ते ७६ टक्के पाणीसाठा होता. नाशिक, पुणे आणि कोकण या प्रदेशात तुलनेने पाण्याचा सुकाळ दिसून येत आहे. राज्याचे एकूण चित्र पाहिल्यास ८ पैकी चार वर्षे निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असल्याचे आकडेवारी सांगते. तर २०१५ मध्ये आठ वर्षांतील दुष्काळाची तीव्रता अधिक नोंदविण्यात आली.मराठवाड्यावर संकटमराठवाड्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये तर अवघा १४ टक्केच पाणीसाठा होता. त्यावेळी लातुरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र