शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

माथाडींचे घरांचे स्वप्न विरले

By admin | Updated: November 30, 2015 03:14 IST

मुंबईसह संपूर्ण राज्याच्या धान्य, शेतमाल व अन्य बाजारपेठांतील उलाढालीचा कणा असलेल्या माथाडी कामगारांचे स्वत:चे घरकुल साकारण्याचे स्वप्न हवेतच विरले आहे

नंदकुमार टेणी, ठाणेमुंबईसह संपूर्ण राज्याच्या धान्य, शेतमाल व अन्य बाजारपेठांतील उलाढालीचा कणा असलेल्या माथाडी कामगारांचे स्वत:चे घरकुल साकारण्याचे स्वप्न हवेतच विरले आहे. या दिवाळीपूर्वी या घरकुलांचा प्रश्न मी निकालात काढेन, असे मुख्यमंत्र्यांनी आमदार नरेंद्र पाटील यांना दिलेले आश्वासनही हवेतच विरले आहे. या मुळे या घरकुलांसाठी चेंबूर आणि वडाळा येथे शासनाने दिलेले दोन भूखंड पडून असून, घरकुलांसाठी माथडींनी भरलेले जवळपास अडीचशे कोटी अडकून पडले आहेत.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तसेच अन्य भागांत साडेचार लाखांहून अधिक माथाडी कार्यरत आहेत. त्या पैकी किमान काहींना तरी हक्काचे घरकुल मुंबईत स्वस्तात उपलब्ध व्हावे, या हेतूने माथाडींचे तत्कालीन नेते अण्णासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला होता. १९८८ मध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी वडाळा आणि चेंबूर येथे दोन प्रशस्त भूखंड या घरकुलांसाठी मंजूर केले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांचा ताबा माथाडी कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेकडे येईपर्यंत २००६ साल उजाडले. या पैकी, वडाळा येथील भूखंडावर घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली. चार-पाच मजल्यापर्यंतचे काम झाले असतानाच मुंबई महापालिकेने जी नवीन विकास नियमावली लागू केली. त्यामुळे या भूखंडांचे स्वरूपच बदलून गेले. योजना सुरू झाली, तेव्हा तीन लाखांत मिळणारी ही घरे या नियमावलीमुळे ३४ ते ३५ लाखांच्या घरात गेली. परिणामी, ही सगळी योजनाच ठप्प झाली. कारण या योजनेतील घरांचे जे निर्धारित क्षेत्रफळ होते, त्यानुसार घरे देण्याकरिता गृहनिर्माण संस्थेला जादा एफएसआय विकत घ्यावा लागणार होता. त्यापोटी १४४ कोटी मोजावे लागणार होते. हा १४४ कोटींचा भूर्दंड कोणी सोसायचा, असा प्रश्न निर्माण झाला. एक तर ही घरे म्हाडाने निर्धारित किमतीत बांधून द्यावी किंवा राज्य शासनाने १४४ कोटींचे अनुदान द्यावे किंवा महापालिकेने अपवाद म्हणून या गृहनिर्माण योजनेला या नियमावलीतून सूट द्यावी, असे तीन पर्याय सुचविण्यात आले. परंतु त्याबाबत एकमत झाले नाही. या इमारती बांधण्याचे काम आमदार विजय सावंत यांच्या वैभव डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना देण्यात आले होते. त्यांनीही बरेच प्रयत्न केले, परंतु हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. ३१ डिसेंबर २००९ रोजी या सदनिका माथाडींना वितरित होणे अपेक्षित होते, परंतु अद्यापपर्यंत वडाळा येथील इमारतींचे चार मजल्यापर्यंत स्लॅबचे काम झाले आहे. तर चेंबूर येथील भूखंडावर कोणतेच काम झालेले नाही. ज्या कामगारांना या सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आलेले आहे त्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडलेले आहेत. घरे ही नाहीत आणि पैसेही अडकून पडलेले अशी त्यांची अवस्था झाली आहे. ही घरे तीन लाख रुपयांत या माथाडींना द्यायची व गरज भासल्यास १० टक्के दराने कर्ज द्यायचे असे म्हटले होते, परंतु त्यातले प्रत्यक्षात काहीही झाले नाही. वडाळा येथील योजनेला स्व. यशवंतरावजी चव्हाणनगर असे नाव ही देण्यात आले होते, परंतु सध्या तरी ही योजना थंड बस्त्यात आहे. या योजनेसाठी लाखो रुपये ज्यांनी भरले ते अनेक कामगार आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तर काही दिवंगतही झाले आहेत. आता आम्हाला घरे नकोत भरलेले पैसे आम्हाला परत मिळाले तरी चालतील, अशा मानसिकतेत काही आलेले आहेत. परंतु त्यांची दादफिर्याद कुठेही लागत नाही.