मुरबाडमध्ये चौथीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, भानामतीचा प्रकार असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:41 IST2018-03-29T05:41:00+5:302018-03-29T05:41:00+5:30

नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सूरज ज्ञानेश्वर भोईर (१०) या चौथीतील विद्यार्थ्याची बुधवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली.

Doubtful of the murder of fourth student of Murbad, Banamati's type | मुरबाडमध्ये चौथीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, भानामतीचा प्रकार असल्याचा संशय

मुरबाडमध्ये चौथीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, भानामतीचा प्रकार असल्याचा संशय

मुरबाड : नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सूरज ज्ञानेश्वर भोईर (१०) या चौथीतील विद्यार्थ्याची बुधवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी जयवंत भोईर याला अटक करण्यात आली आहे.
हत्येचा प्रकार उघडकीस आल्यापासून आरोपी गायब होता. ही हत्या त्यानेच केली असावी व तो भानामतीचे प्रकार नेहमीच करतो, असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता त्याने विष प्राशन केल्याचे आढळले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या उन्हाळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरतात. बुधवारी सूरज नेहमीप्रमाणे सकाळच्या शाळेत आला. लघुशंकेसाठी तो बाहेर गेला, काही वेळाने तो शाळेशेजारील ओसाड घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्याला मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Doubtful of the murder of fourth student of Murbad, Banamati's type

टॅग्स :Crimeगुन्हा