शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:29 IST

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

सावंतवाडी/दापोली : मला दहा दिवसांत जेलमध्ये टाकणार असे म्हणतात, पण मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका आणि हलक्यात पण घेऊ नका. मी संघर्षातून वर आलेलो आहे, जेलची भाषा माझ्यासाठी नवीन नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेवर नाव न घेता टीका केली.

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, कुडाळ मालवणचे शिंदेसेनेचे उमेदवार नीलेश राणे, उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोकण आणि शिवसेनाप्रमुख यांचे वेगळे नाते होते. कोकणने शिवसेनाप्रमुखांना भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. यासाठी मला मंत्री केसरकर यांनी खंबीर साथ दिली. माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले.

गुवाहाटीत केसरकर यांनी घेतलेली भूमिका ही राजकारणातील सचिन तेंडुलकरसारखी होती. त्यामुळे केसरकर नक्कीच विजयाचा चौकार मारतील आणि सावंतवाडीचा कप जिंकून आणतील, असे शिंदे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंवर टीका

आदित्य ठाकरे हे ओसाड गावचे युवराज आहेत. आदित्य ठाकरे ज्यांना काका म्हणतात त्यांचेच खाते त्यांनी काढून घेतले व बेईमानी केली, असा आराेप त्यांनी केला.

मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसशी अभद्र युती केली

- मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सर्वसामान्य माणूस आहे. गोरगरीब जनतेचे कल्याण हेच मी नेहमी डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो याचा मला अभिमान आहे.

- अडीच वर्षांपूर्वी मी जेव्हा सत्तेच्या विरोधात उठाव केला तेव्हा माझ्यावर अनेक आरोप झाले, पण मी घाबरलो नाही.

- २०१९ मध्ये महाराष्ट्राने युतीला कौल दिला, पण जनतेचा अपमान करत काहींनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसशी युती केली आणि जनतेचा अपमान केला. पण हे मला मान्य नव्हते, त्यामुळेच मी हा उठाव केला.

कोकणात रोजगार निर्माण करणार

कोकणच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या माध्यमातून रस्ते, पाखाड्या, धरणे यांची कामे करण्यात येतील. त्यामुळे कोकणचा बॅकलॉग भरून निघेल आणि मुंबई, पुण्याकडे कोकणातील तरुणांना रोजगारासाठी जाण्याची गरज लागणार नाही, असे एकनाथ शिंदेदापोलीमध्ये म्हणाले.  महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी आझाद मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना शिंदे यांनी कोयनेचे ६७ टीएमसी पाणी अडवून तीन जिल्हे सुजलाम-सुफलाम करण्यात येतील. केंद्रानेही याला मंजुरी दिली असून, येथील रोजगारात वाढ होईल, असे सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024dapoli-acदापोलीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे