शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 10:45 IST

Congress Criticize BJP: काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवार, २ तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करुन भाजप सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात काँग्रेसने जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवार, २ तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत’, असे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावरील पुतळा अनावरणाच्या वेळी सांगितले होते. आता पंडित नेहरुंच्या नावाने भाजप अपप्रचार करत आहेत. अर्धवट माहितीच्या आधारावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. ‘नेहरु यांच्याबद्दलचा अपप्रचार फडणवीस यांनी थांबवावा.  असे पटोले म्हणाले. 

‘हा प्रकार राजकारणापलिकडचा’ - यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, पुतळा कोसळल्याचा प्रकार राजकारणापलिकडचा आहे, या घटनेने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.- १९ व्या शतकात कोण इतिहास लिहित होते हे सर्वांना माहित आहे, योग्य व्यक्तींनी लिहिलेलाच इतिहास वाचला पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले.

‘जनतेच्या मनात प्रचंड राग’अ. भा. काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा यावेळी म्हणाले की, पुतळा कोसळ्याने देशभरातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे.फक्त पुतळा कोसळला नाही तर लोकांचे मन दुखावले आहे. धमकीच्या स्वरात मागितलेली माफी मंजूर नाही. महाराजांच्या अस्मितेशी चालवलेला खेळ खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज