शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पाच दिवसांच्या मुलीचा गूढ मृत्यू!

By admin | Updated: March 13, 2015 05:42 IST

येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा त्याच हॉस्पिटलच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी

डोंबिवली : येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा त्याच हॉस्पिटलच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ८.३०च्या सुमारास घडली. या नवजात अर्भकाला रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याचीही चर्चा आहे. या गूढ मृत्यूबद्दल पोलीस तपास करीत आहेत. पाच दिवसांपूर्वी ८ मार्च रोजी अंबरनाथ येथील सुजाता दत्ता गायकवाड (२७) या महिलेने सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर या मुलीला जन्म दिला होता. गुरुवारी बाळ-बाळंतिणीस घरी सोडण्यात येणार होते. गुरुवारी सकाळी ७.३० वा. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे सर्व तपासणी केली. त्यानंतर तासाभराने या रुग्णालयाच्या डॉ. हर्षदा पुष्कर प्रधान यांना ते बाळ रुग्णालयाच्या मागील बाजूच्या आवारात खाली पडल्याचे आढळून आले. तपासणी केली असता, ती नवजात मुलगी मृत झाल्याचे त्यांना आढळले. तिच्या डोक्याला मार लागला होता, असे सूत्रांकडून  समजते. खबर मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व संबंधितांची चौकशी केल्यावर आणि मृत बाळाचे कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन पार पडल्यावर सायंकाळी ४ च्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.तिचा मृत्यू नेमका कशामुळे आणि कोणामुळे झाला, याबाबतची माहिती पोलीस मिळवत आहेत. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा रुग्णालयात बाळाची आईसह तिच्या दोन्हीकडच्या आजी उपस्थित होत्या. त्यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व इतर रुग्ण यांच्या चौकशीतून संध्याकाळपर्यंत कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फेकले की मारून ठेवले?जेथे बाळाने जन्म दिला ती जागा आणि त्यांना ठेवण्यात आलेला वॉर्ड ही जागा दुस-या मजल्यावर आहे. मात्र ते बाळ जेव्हा मयत आढळले तेव्हा ते रुग्णालय इमारतीच्या तळमजल्यावरील खालच्या बाजूला पडलेले आढळले. म्हणजे त्या बाळाला फेकण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला का? याचही तपास पोलीस करीत आहेत. बाळाला कोठेही बाह्य रक्तस्त्राव झाला नाही. डोक्याला आतून मार लागल्याचे सांगण्यात आले. दुस-या मजल्यावरुन ते बाळ पडले अथवा फेकले असते तर त्याला बाह्य दुखापत व्हायला हवी होती, ती का झाली नाही असा सवाल आहे.