न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटते का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला झापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 08:51 IST2023-08-12T08:50:38+5:302023-08-12T08:51:02+5:30
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला होता.

न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटते का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला झापले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा सतत न्यायालयात गैरहजर राहत असल्याने विशेष न्यायालयाने त्यांना खडसावले. ‘न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटते का?’, अशा शब्दांत न्यायालयाने राणा दाम्पत्याचे कान टोचले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. मात्र, लोकसभेचे कारण देत नवनीत राणा सतत न्यायालयात गैरहजर राहत आहेत. रवी राणाही अनुपस्थित राहत आहेत.
याबाबत न्यायालयाने वारंवार ताकीद देऊनही गुरुवारच्या सुनावणीस दोघेही गैरहजर राहिले. ‘नवनीत राणा लोकसभेत आहेत. पण, रवी राणांचे काय? न्यायव्यवस्था म्हणजे तुम्हाला गंमत वाटते का?’ अशा शब्दांत न्यायालयाने खडसावले.