महापालिका रुग्णालयांत लवकरच डॉक्टरांची भरती
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यल्प मानधन मिळत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी पालिका रुग्णालयांकडे पाठ फिरवली आहे़

महापालिका रुग्णालयांत लवकरच डॉक्टरांची भरती
मुंबई : खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यल्प मानधन मिळत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी पालिका रुग्णालयांकडे पाठ फिरवली आहे़ त्याचबरोबर आता निवासी डॉक्टरांचीही कमतरता जाणवू लागली आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी सोमवारी केली़ याला प्रशासनानेही अनुकूलता दर्शविली आहे़
तज्ज्ञांची अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे रात्रपाळीसाठी एका डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणी नगरसेवक विनोद शेलार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली़ रुग्णालयांची दुरुस्ती, रिक्त
पदे भरण्याची सूचानाही त्यांनी केली़ (प्रतिनिधी)
>सवलतीच्या दरात अक्रेलिक प्लास्टर : औषध, हॅन्डग्लोव्हज आणि प्लास्टरसाठी रुग्णांना बाहेर पाठविण्यात येते, अशी तक्रार काँग्रेसचे सुनील मोरे यांनी केली़ अक्रेलीक प्लास्टर महागडे आहे़ ते सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे.