आजारपणाला कंटाळून डॉक्टरनं संपवली जीवनयात्रा
By Admin | Updated: April 18, 2017 14:55 IST2017-04-18T14:33:42+5:302017-04-18T14:55:01+5:30
आजारपणाला कंटाळून भंडारा येथील एका डॉक्टरनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

आजारपणाला कंटाळून डॉक्टरनं संपवली जीवनयात्रा
ऑनलाइन लोकमत
भंडारा, दि. 18 - आजारपणाला कंटाळून एका डॉक्टरनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. डॉक्टर प्रीतिश भोयर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून ते चर्मविकार तज्ज्ञ होते. त्यांचे वय अवघे 30 वर्षे इतके होते. प्रीतिश हे भंडा-यातील गुजराती कॉलनी येथे राहत होते.
पोटाच्या विकारानं ते त्रासले होते. आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलले. सलाइनमध्ये विष मिसळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी तसे नमूद केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.