शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

माणसांच्या पदानुसार शब्दही बदलतात का? ठाकरेंचा सवाल; ओला दुष्काळ जाहीर करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:30 IST

मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ नियमात बसत नसल्याचे सांगत आहेत. मात्र, २०२० मध्ये विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती, असा दाखल देत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त, शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. माणसाकडे पद आले की त्यानुसार त्याचे शब्दही बदलतात का, असा टोलाही त्यांनी लगावला.

पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १० रुपये असे टनामागे १५ रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शेतकऱ्यांचाच खिसा कापून त्यांनाच मदत करण्याचा हा प्रकार आहे. साखर संघानेदेखील या निर्णयाला विरोध केला आहे. शेतकरी अतिशय उद्विग्न झाले असून आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. परंतु, मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. 

भाजपत आल्यावरच मिळेल कर्जमुक्ती? भाजपमध्ये गेलेल्या काही साखरसम्राटांच्या कर्जाची परतफेड सरकार करणार आहे. साखरसम्राटांना भाजप सरकारने कर्जमाफी दिली. पीक नष्ट झाल्याने शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबले आहेत. जमीन, मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतरच त्यांना कर्जमुक्त करणार का? भाजप त्यासाठीच थांबला आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.

पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधाकेंद्राचे पथक अजूनही राज्यात आलेले नाही. नुकसानीची पाहणी होणार कधी? पंचनामे होणार कधी? तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे? घरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.

कागदी घोडे नाचवू नकापूरग्रस्त भागातील शाळा तत्काळ सुरू करा. रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. बी-बियाणे कोण उपलब्ध करणार? शेतकरी पुढच्या हंगामाची तयारी कशी करणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे नियमांचे कागदी घोडे नाचवू नका. तातडीने लक्ष देऊन संकटात असलेल्या महाराष्ट्रासाठी तरी दिल्ली गाठा, असे ठाकरे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Demands Declaration of Wet Drought, Questions Changing Stance

Web Summary : Uddhav Thackeray urges the government to declare a wet drought and aid flood-affected farmers. He criticized the government's decision to deduct funds from sugarcane farmers for relief efforts and questioned their focus on advertisements amidst farmer distress. Thackeray also demanded assistance for rebuilding homes.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर