शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकी पेशा नको रे बाबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:14 IST

डीएड अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करत होते.

ठळक मुद्देडीएड अभ्यासक्रमास केवळ १० हजार अर्जशैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शिक्षण विभागातर्फे सुमारे २००५ पासून भरलीच गेली नाही शिक्षकांची रिक्त पदे

पुणे : बारावीनंतर डी. एड्.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून यंदा प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. परिणामी राज्यातील डी.एड्.अभ्यासक्रमाच्या तब्बल ३५ ते ४० हजार जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे  ‘शिक्षकी पेशा नको रे...’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक ,संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून बुधवारी (दि.२४) तिस-या प्रवेश फेरीतून प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यात अनुदानित व विना अनुदानित डीएड अभ्यासक्रमाच्या एकूण ५३ हजार जागा असून प्रवेशासाठी केवळ १० हजार ७२८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमते एवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. परिणामी प्रवेश अर्ज करणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे. डीएड् अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करत होते. त्यातील ५० टक्के विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते.परंतु,आता विद्यार्थ्यांनीच डीएडकडे पाठ फिरवली.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षात डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटली. त्यातच शासनाकडून राबविल्या जाणा-या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याऐवजी काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशास पसंती देत आहेत. तिसऱ्या फेरीपर्यंत सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत, असे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...........राज्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून शिक्षण विभागातर्फे सुमारे २००५ पासून शिक्षकांची रिक्त पदे भरलीच गेली नाहीत. त्यातच सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र,अद्याप त्यातून एकाही नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. नोकरी नसल्यामुळे विद्यार्थी डीएडकडे पाठ फिरत आहेत.परिणामी डीएड महाविद्यालयांना टाळे लागत आहे.मागील वर्षापेक्षा यंदा प्रवेशाच्या दोन  हजार जागा कमी झाल्या असून यंदा डीएडला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १२ ते १५ हजारापर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. .....डीएड प्रवेशाची तीन वर्षांची आकडेवारी वर्ष            महाविद्यालय      प्रवेश         झालेले                     संख्या                क्षमता       प्रवेश २०१६-१७    ९८९                   ६२,७३३     २०,२०४  २०१७-१८    ९४९                  ६०,२३३      १७,८७५  २०१८-१९     ८४७                ५५,६४४       १७,०९२   

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळाState Governmentराज्य सरकार