परीक्षेचं टेन्शन नको, लगेच अ‍ॅक्शन घ्या...

By Admin | Updated: February 21, 2015 01:23 IST2015-02-21T01:23:21+5:302015-02-21T01:23:21+5:30

च्विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास शक्यतो पालकांनी स्वत: पुढाकार घेऊन तिचे निराकरण करावे त्याने विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ व श्रम वाचतील.

Do not tense test, take action right away ... | परीक्षेचं टेन्शन नको, लगेच अ‍ॅक्शन घ्या...

परीक्षेचं टेन्शन नको, लगेच अ‍ॅक्शन घ्या...

दहावी-बारावी परीक्षा : ताणतणावांच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कृती करा
अतिशय महत्त्वाचे
च्कोणत्याही परीक्षेपेक्षा आपले जीवन हे खूपच जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न जरूर करा, परंतु याउपर काही अनपेक्षित समोर आले तरी धैर्याने व संयमाने पुढील प्रयत्न चालू ठेवा.
च्पेपर दिल्यानंतर त्याचे विश्लेषण करून झालेल्या चुकांची नोंद घ्या व पुढे त्या टाळता येतील असे बघा.
च्प्रत्येक पेपरनंतर स्वत:ला रिलॅक्स करा आणि मग नव्याने पुढील विषयाला सुरुवात करा.
च्मनात काही प्रश्न-शंका असतील तर त्वरित त्याचे निरसन करून घ्या.
च्काही गंभीर समस्या असल्यास शाळा-कॉलेज किंवा बोर्डाच्या हेल्पलाइनमार्फत ती सोडवून घ्या.
च्कोणत्याही परिस्थितीत निराश न होता स्वत:ला आनंदी-उत्साही व आशादायी मन:स्थितीत ठेवा.

दहावी-बारावी परीक्षांच्या दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला कधी ना कधी कमीअधिक प्रमाणात मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो. परंतु ताण घेऊन फायदा न होता नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते आणि मग त्यातून पुन्हा ताणतणाव! त्यापेक्षा ताणतणावांच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कृती केली तर ताणतणावांपासून सुटका तर मिळतेच, उलट परीक्षांच्या काळातील बहुमोल वेळेचीही बचत होते. शिवाय असे केल्याने पुन्हा अभ्यासावर त्वरित लक्ष केंद्रित करता येते.

बोर्डाच्या हेल्पलाइन्सचे महत्त्व
1हेल्पलाइन्सवर येणाऱ्या कॉल्सची संख्या व प्रश्नांचे स्वरूप बघता दहावी-बारावी परीक्षांच्या दरम्यान मंडळाद्वारे कार्यान्वित हेल्पलाइनचे महत्त्व अधोरेखित होते. अर्थात दहावी-बारावी परीक्षार्थींची संख्या व हेल्पलाइनवर येणारे कॉल्स प्रातिनिधिक स्वरूपातील असतात. या हेल्पलाइनवर येणारे कॉल्स जास्तकरून विद्यार्थ्यांचेच असतात. परंतु साधारणपणे २५ टक्के कॉल्स हे पालकांचेसुद्धा असतात.

2विद्यार्थ्यांच्या या कॉल्सपैकी ५0 टक्के प्रश्न हे प्रत्यक्ष अभ्यासाच्या समस्यांबाबत असतात तर एवढेच कॉल्स विषयवार शंका, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप तसेच बैठक व्यवस्था, हॉलतिकीट याविषयीचे शाळा-कॉलेज व बोर्डाशी संबंधित माहितीसाठी असतात. यासाठी कौन्सिलिंग हेल्पलाइन क्र मांक व बोर्ड हेल्पलाइन क्र मांक यासंबंधी खुलासेवार माहिती देणे गरजेचे आहे. म्हणजे योग्य क्र मांकावर योग्य माहिती मिळू शकेल.

3हेल्पलाइनचे महत्त्व अजून एका महत्त्वाच्या कारणासाठी आहे ते म्हणजे हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्समध्ये १0 ते २0 टक्के विद्यार्थी हे परीक्षेच्या काळजीने तणावग्रस्त असतात. त्यांना अशा स्थितीत आश्वासक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या मानसिकतेत घडलेला सकारात्मक बदल त्यांच्या बोलण्यातून निश्चितच जाणवतो.

यात वेळ वाया घालवू नका
च्पेपर झाल्यावर त्यात मिळणारे गुण किंवा त्याचा निकालावर होणारा परिणाम यावर अजिबात विचार करू नका.
च्याधी किती अभ्यास झाला, त्याचा परीक्षेत काय परिणाम होईल याची चिंता करण्यापेक्षा हाती असलेल्या वेळेत जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा.
च्या वर्षी बेस्ट फाइव्ह असेल का, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, मोस्ट आय.एम.पी. काय आहे यामध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. काही संभ्रम असल्यास योग्य व्यक्तींशी संपर्क करून किंवा स्वत:च्या सारासार विवेकबुद्धीनुसार निर्णय घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

च्अभ्यासात अडथळा टाळण्यासाठी मोबाइल किंवा फोन कॉल्स यापासून अलिप्त राहा. कारण ऐन अभ्यासातील लय अशा अडथळ्यांमुळे बिघडते व मग ती पुन्हा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो.

च्परीक्षेसंबंधित कोणतीही माहिती सरळ शाळा-कॉलेज किंवा बोर्डाच्या हेल्पलाइनमधून मिळवा. इतर ठिकाणाहून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोंधळून जाऊ नका.

पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे
च्विद्यार्थ्यांना पाठिंबा व आवश्यक ती सुविधा देण्याची भूमिका पालकांनी पार पाडावी. पालकाची व शिक्षकाची अशी दुहेरी भूमिका (ते स्वत: शिक्षक असले तरी) बजावताना फायद्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असल्याने ते टाळावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार अभ्यासाची पद्धत ठरवू देत.
च्विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास शक्यतो पालकांनी स्वत: पुढाकार घेऊन तिचे निराकरण करावे त्याने विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ व श्रम वाचतील.
च्कोणत्याही परिस्थितीत पालकांनी स्वत: ताणतणाव न घेता कृती करावी म्हणजे विद्यार्थ्यांनाही त्याची झळ पोहोचणार नाही.
च्आपल्या पाल्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होतील याची काळजी घ्यावी व त्यासाठी दक्ष असावे. पाल्याच्या वागणुकीत काही बदल आढळल्यास त्वरित त्याच्या कारणांसंदर्भात त्याच्याशी संवाद साधून त्यावर उपाययोजना करावी.

परीक्षांच्या काळात अत्यंत उपयोगी ठरतील अशा
काही खास टिप्स
च्परीक्षा समाप्त होईपर्यंतचे वेळापत्रक आखून त्याबरहुकूम अभ्यास करा.
च्परीक्षा समाप्त होईपर्यंत अभ्यासासाठी बराच वेळ मिळणार आहे, या वेळेचा सदुपयोग केला तर त्याचा निकालात चांगला परिणाम बघायला मिळेल.
च्वर्षभर जो अभ्यास केलाय त्याविषयी स्वत:वर विश्वास ठेवा आणि स्वत:चे मानसिक संतुलन राखून जास्तीत जास्त अभ्यास करा.
च्जास्तकरून प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव करा व घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.
च्शेवटच्या क्षणी उजळणी करण्यासाठी स्वत:च्या नोट्स तयार करा.
च्कठीण मुद्दे, सूत्रे एका कागदावर टेबल स्वरूपात तयार करून अभ्यासाच्या खोलीत चिकटवा. त्याने येता-जाता कळत-नकळतपणे त्यांची उजळणी होत राहील.
च्सकाळी ताज्या दमात वाचन करा व जेवल्यावर लिहिण्याचा अभ्यास करा.
च्अभ्यास करताना प्रत्येक तासानंतर थोडी विश्रांती घ्या, मूड फ्रेश होईल असं काही करा आणि पुन्हा अभ्यासाला लागा.
च्याआधी तुम्हाला चांगले परिणाम दिसले असतील अशा स्वत:च्या अभ्यासाच्या पद्धतीनुसारच अभ्यास करा.
च्रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका, शरीराला आणि मेंदूला आराम मिळून येणाऱ्या दिवसासाठी पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी पुरेशी झोप खूप आवश्यक आहे.
च्स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. कारण बरेच दिवस परीक्षा चालणार असल्याकारणाने तोपर्यंत शारीरिक-मानसिक आरोग्य टिकवणे गरजेचे आहे.

 

Web Title: Do not tense test, take action right away ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.