शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषा आणि मातृभूमीला विसरू नका - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 20:35 IST

ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये.

पिंपरी - ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. घर, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मातृभाषेतच बोलावे, भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी येथे आज केले.

पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या नवव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू पी. एन राजदान, अधिष्ठाता डॉ. ए. एन सुर्रेकर, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गुरू सेवा मंडळाचे अ‍ॅड. विष्णू पारनेरकर, पुढारी वृत्तपत्र समूहाचे चेअरमन प्रतापसिंह जाधव यांनी डीलीट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच  केआयआयटी भुवणेश्वरचे संस्थापक प्रा. अच्युत सामंता यांना डॉक्टर आॅफ सायन्य पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी १०५६ विद्यार्थ्यांना पदवी आणि १९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि बारा विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. 

‘‘विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पदवीदान हा अंत्यत महत्वाचा क्षण आहे. या सोहळ्यास उपस्थित असणा-या सर्वांना माझा नमस्कार. मराठी ही अत्यंत सुंदर भाषा आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मराठीतून बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तीस मिनिटांच्या भाषणात मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले. युवाशक्ती, शिक्षण प्रणाली, संस्कृती, पालकांची कर्तव्ये यावर भाष्य करून पुणेकरांना जिंकले. उपराष्ट्रपती म्हणाले, ‘‘शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाविद्यालयीन शिक्षण हा ज्ञानप्राप्तीचा महत्वाचा टप्पा आहे. मुलांनी नेत्रदीपक यश मिळविले सर्वांचे अभिनंदन. कुटुंब, समाज आणि देश विकासाची मोठी जबाबदारी तरूणांवर आहे. देशाचे भवितव्य तरूणांच्या हाती आहे. अतिथी देवो भव्, मातृदेवो, पितृदेवो भव्, वसुदेव कुटुंबम् आणि समधर्म समभाव ही आपली संस्कती आहे. संस्कृतीचे जतन करण्याचे काम करावे. त्यामुळे देशाच्या विकासात हातभार लावावा.’’ 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड