‘मांसाहारी मॅगी’ खाऊ नका!

By Admin | Updated: June 3, 2015 01:21 IST2015-06-03T01:21:52+5:302015-06-03T01:21:52+5:30

जैन समुदायाच्या साधूसंतांनी ‘मॅगी’ला ‘मांसाहारी’ खाद्यपदार्थ घोषित केले असून ते न खाण्याचे आवाहन केले आहे. ज्या जैन कुटुंबात मॅगी बनेल तेथील

Do not eat non-vegetarian mangoes! | ‘मांसाहारी मॅगी’ खाऊ नका!

‘मांसाहारी मॅगी’ खाऊ नका!

नवी दिल्ली: जैन समुदायाच्या साधूसंतांनी ‘मॅगी’ला ‘मांसाहारी’ खाद्यपदार्थ घोषित केले असून ते न खाण्याचे आवाहन केले आहे. ज्या जैन कुटुंबात मॅगी बनेल तेथील अन्नपाणी ग्रहण न करण्याचा निर्णयही या साधूसंतांनी घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ‘मॅगी नुडल्स’मध्ये मांसाहारी तत्त्व आढळल्याने, हा मांसाहारी खाद्यपदार्थ आहे आणि त्यामुळे याचे सेवन वर्ज्य आहे, असे निर्देश परमपूज्य आचार्य श्री महाप्रयणजी म.सा. यांनी जैन समुदायाच्या सदस्यांना दिले आहेत. मॅगी मांसाहारी असल्याने ते खाणे जैन श्रावक-श्राविकांसाठीही प्रतिबंधित आहे. परमपूज्य महाप्रयणजी म.सा. यांनी म्हटले आहे की, मॅगीत समाविष्ट घटकांची माहिती दडवून कंपनीने आक्रमक प्रचार चालवला होता. त्यामुळे गत काही वर्षांत लहान मुलांमध्ये मॅगी लोकप्रिय झाली होती.जाहिरातींद्वारे मुलांची दिशाभूल करून त्यांच्यात आपले उत्पादन अधिकाधिक लोकप्रिय करण्यावर कंपनीने भर दिला होता. आता मॅगी शाकाहारी नसून मांसाहारी असल्याचे सत्य बाहेर आल्याने मुलांना यापासून दूर ठेवले गेले पाहिजे. मुलांनी कुठल्याही प्रकारे मॅगी खाऊ नये, हे पालकांनी बघावे. मांसाहारी असण्यासोबत मॅगीत आरोग्यास घातक असे घटकही आहेत, हेही समजून घेण्याची गरज आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Do not eat non-vegetarian mangoes!