मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबांनी नगरहून गाठली मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 13:03 IST2020-02-09T13:00:30+5:302020-02-09T13:03:25+5:30
मनसे स्थापनेपासून ते पक्षात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबांनी नगरहून गाठली मुंबई
मुंबई : पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. यासाठी राज्यभरातील मनसैनिक आझाद मैदानावर दाखल होत आहे. असेच एका दिव्यांग आजोबांनी पक्षाच्या मोर्च्यासाठी नगरहून मुंबई गाठली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असलेले हे आजोबा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. मनसे स्थापनेपासून ते पक्षात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज ठाकरेंनी पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध घेतलेली भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे असे यावेळी ते म्हणाले.
तर अशा घुसखोरी करणाऱ्यांना हाकलून लावल्यास स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे ते म्हणाले.