शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

घटस्थापनेला घटस्फोट! नारायण राणेंनी दिला कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 3:41 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून नारायण राणे काय करणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. ते लवकरच कॉंग्रेसपक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात होतं. आज अखेर कुडाळमध्ये त्यांनी कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

सिंधुदुर्ग, दि. 21 - नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत  बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) राणे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकत कॉंग्रेससोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला असं राणे म्हणाले. नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे - 

तुम्ही काय मला काढणार मीच कॉंग्रेस सोडतो

संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा  करून पुढील निर्णय घेणार, नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे 

शिवसेनेचे जवळपास 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

 काँग्रेसचं महाराष्ट्रातलं दुकान बंद होणार

 नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेतीलही अनेक आमदार राजीनामा देतील 

 भाजपपुढे नाक घासतात, उद्धव ठाकरेंना नाकच नाही राहिलं

 दसऱ्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन मी माझी पुढची रुपरेषा स्पष्ट करेन

 नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ

महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही

सर्वात वरिष्ठ असूनही गटनेतेपद दिलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी रणपिसेंना गटनेता केलं

48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं

12 वर्षे काँग्रेसनं माझा उपयोग करुन घेतला 

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील 

शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष रिकामे करणार

 महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो

आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते

अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु

अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली 

काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे

26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो

विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही

 मला मँडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार 

तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं

 मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही

महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो

4 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली