शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पोस्टमनना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवेकर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 7:08 AM

टपाल खाते चहाऐवजी लिंबूपाणी देणार

मुंबई : दिवसभर उन्हातान्हात फिरणाऱ्या व कामाच्या ताणामुळे जेवणाच्या वेळा चुकत असणाºया पोस्टमनच्या तंदुरुस्तीसाठी टपाल खात्याने आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे मार्गदर्शन घेतले आहे. टपाल खात्याचा आयकॉन असलेल्या पोस्टमनचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी आता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना आहार घेण्यास सांगण्यात आले आहे.मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या संकल्पनेतून पोस्टमनना अधिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवेकर यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर दिवेकर यांनी जीपीओमध्ये येऊन पोस्टमनसोबत संवाद साधला व त्यांना आहाराबाबत मार्गदर्शन केले. दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे टपाल कर्मचाऱ्यांना चहाऐवजी लिंबूपाणी पुरविण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती स्वाती पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोस्टमन हा टपाल खात्याचा आरसा आहे. मात्र त्यांच्या आरोग्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे पोस्टमनची फिटनेस लेव्हल वाढविण्याचा विचार केला व त्यासाठी दिवेकर यांना आमंत्रित करण्यात आले. दिवेकर यांनी पोस्टमन व टपाल कर्मचाºयांना बहुमोल सल्ला दिला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज पांडे यांनी व्यक्त केली.तर, या वेळी मार्गदर्शन करताना दिवेकर म्हणाल्या, मी अनेक ठिकाणी गेल्यावर तेथील व्यक्तींना जास्तीतजास्त चालण्याचा सल्ला देते. मात्र, पोस्टमन मुळातच दिवसभर चालत असल्याने त्यांना हा सल्ला देऊ शकत नाही. पोस्टमन किती कष्ट करतात व काम करतात याची जाणीव आहे. ती सर्वांनाच असायला हवी. पोस्टमननी त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस