"शिवबंधनावर अविश्वास? एक्स्पायरी डेट संपली की, आमदारांचा पक्षावरील विश्वास उडाला’’, भाजपाचा सेनेला बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 20:46 IST2022-06-06T20:44:50+5:302022-06-06T20:46:00+5:30
Keshav Upadhye: शिवबंधनाचा धागा बांधूनही सेना आमदार पक्षाविरोधात जाणार असतील तर त्या बंधनाला अर्थ काय? त्याची एक्स्पायरी डेट संपली की पक्षप्रमुखांच्या मुख्यमंत्री म्हणून निष्क्रीय कामगिरीमुळे आमदारांचा स्वपक्षावरील विश्वास उडाला?, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.

"शिवबंधनावर अविश्वास? एक्स्पायरी डेट संपली की, आमदारांचा पक्षावरील विश्वास उडाला’’, भाजपाचा सेनेला बोचरा सवाल
मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. तसेच निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेलमध्ये रवाना केले आहे. दरम्यान, आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याच्या शिवसेनेच्या चालीवर भाजपाने खोचक टीका केली आहे. शिवबंधनाचा धागा बांधूनही सेना आमदार पक्षाविरोधात जाणार असतील तर त्या बंधनाला अर्थ काय? त्याची एक्स्पायरी डेट संपली की पक्षप्रमुखांच्या मुख्यमंत्री म्हणून निष्क्रीय कामगिरीमुळे आमदारांचा स्वपक्षावरील विश्वास उडाला?, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीसाठी मोठमोठे दावे करत दुसरा उमेदवार देणाऱ्या शिवसेनेची सध्या पुरती झोप उडाली आहे. पराभव समोर दिसत असल्याने सैरावैरा पळून मतांची बेगमी करताना शिवसेनेच्या बड्या नेत्यांची फे फे उडताना दिसत आहे. दरम्यान, अपक्ष आणि छोट्या पक्षांची गोळाबेरीज मांडताना स्वत:च्या पक्षाचेच आमदार शिवसेनेच्या उमेदवारांना मत देणार की नाही, याची भीती सेनापतींना वाटत आहे. त्यामुळेच आमदारांना नजरकैदेत ठेवून पहारे देण्याची तयारी सेना नेतृत्वाने केली आहे.
स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना अशाप्रकारे नजरकैदेच्या पिंजऱ्यात ठेवण्याची आलेली वेळ म्हणजे पक्षप्रमुखांच्या विचारांचा पराभव आणि जनतेतून निवडून आलेल्या आमदारांचा अपमान आहे. यावरून शिवसेना नेतृत्वाचा स्वपक्षातील आमदारांवरच विश्वास नसल्याचं दिसून येत आहे. बाकी शिवबंधनाचा धागा बांधूनही सेना आमदार पक्षाविरोधात जाणार असतील तर त्या बंधनाला अर्थ काय? त्याची एक्स्पायरी डेट संपली की पक्षप्रमुखांच्या मुख्यमंत्री म्हणून निष्क्रीय कामगिरीमुळे आमदारांचा स्वपक्षावरील विश्वास उडाला? असा सवालही केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.