डिस्कळच्या जवानाचा मृत्यू
By Admin | Updated: April 23, 2016 03:48 IST2016-04-23T03:48:52+5:302016-04-23T03:48:52+5:30
राजस्थानातील बिकानेरमध्ये टँकच्या स्फोटात जखमी झालेले डिस्कळचे जवान तुषार तानाजी घाडगे यांचा उपचार सुरू असताना नवी दिल्ली

डिस्कळच्या जवानाचा मृत्यू
बुध (जि. सातारा) : राजस्थानातील बिकानेरमध्ये टँकच्या स्फोटात जखमी झालेले डिस्कळचे जवान तुषार तानाजी घाडगे यांचा उपचार सुरू असताना नवी दिल्ली येथे शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे डिस्कळसह खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. १६ वर्षांपूर्वी भारतीय लष्करात नाईक पदावर भरती झालेले जवान तुषार घाडगे हे राजस्थानातील बिकानेर येथे ०३ मेकॅनिकल इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी तांत्रिक काम करीत असताना टँकचा स्फोट झाला होता. यात काहीजण जखमी झाले होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तुषार घाडगे यांना तातडीने नवी दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.