शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 07:18 IST

सुनेत्रा पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेपूर्वी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील, अशीही शक्यता आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या आठवड्यात अजित पवार गटातर्फे विलीनीकरणाबाबत पक्षांतर्गत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार या मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. शपथविधी झाल्यानंतर त्या मंत्रालयात आलेल्या नाहीत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठक असल्याने त्या बैठकीला हजर राहण्यासाठी मंत्रालयात येतील. तत्पूर्वी त्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री दालनात जाऊन आपल्या पदाची सूत्रे घेतील.

सुनेत्रा पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेपूर्वी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील, अशीही शक्यता आहे. आमचा पक्ष हा अजित पवार यांचा राजकीय परिवार आहे. परिवारातील सर्व सदस्य विलीनीकरणाबाबत निर्णय घेतील, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.

शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्षदुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारही या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी समोर आणणार आहेत. प्रामुख्याने अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार गटाच्या ज्या बैठका झाल्या होत्या, त्या बैठकांना रोहित पवारही उपस्थित होते. अजित पवार यांनी जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावर मी बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा आठवडा महत्त्वपूर्ण घडामोडींचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Merger discussions in Ajit Pawar's NCP; crucial developments this week.

Web Summary : Ajit Pawar's faction to discuss merger this week. Sunetra Pawar assumes office. Rohit Pawar to reveal details about meetings with Ajit Pawar. Key developments expected.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारRohit Pawarरोहित पवार