शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीची चर्चा पुन्हा निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:12 IST

महाआघाडीसाठी मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : महाआघाडीसाठी मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे, तर काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत कोणताच प्रस्ताव मिळाला नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाआघाडीसाठीची सहावी बैठकही निष्फळ ठरली आहे.महाआघाडीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी ३० जानेवारीपर्यंतची मुदत दिल्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी राजगृह येथे आंबेडकरांची भेट घेतली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे आंबेडकर यांनी बैठकीनंतर सांगितले. काँग्रेससोबत आघाडीसाठी आम्ही अजूनही तयार आहोत. मात्र, एमआयएमसोबतची युती तोडणार नसल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीबाबतच्या आक्षेपांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ